Aarti Sangrah
गणपतीची आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयनादास रामाचा वाट पाहे सदना ।संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ३ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
!!गणपती बाप्पा मोरया!!।।मंगलमूर्ती मोरया।।
गणपतीची आरती
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥
जय देव जय देव,जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन
मेरा मन रमता,जय देव जय देव ॥
अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि ।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥
॥ जय देव जय देव...॥
भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥
जय देव जय देव,जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन
मेरा मन रमता,जय देव जय देव ॥
गणपतीची आरती
जय गणेश जय गणेश,जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,पिता महादेवा ॥
एक दंत दयावंत,चार भुजा धारी ।
माथे सिंदूर सोहे,मूसे की सवारी ॥
जय गणेश जय गणेश,जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,पिता महादेवा ॥
पान चढ़े फल चढ़े,और चढ़े मेवा ।
लड्डुअन का भोग लगे,संत करें सेवा ॥
जय गणेश जय गणेश,जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,पिता महादेवा ॥
अंधन को आंख देत,कोढ़िन को काया ।
बांझन को पुत्र देत,निर्धन को माया ॥
जय गणेश जय गणेश,जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,पिता महादेवा ॥
'सूर' श्याम शरण आए,सफल कीजे सेवा ।
माता जाकी पार्वती,पिता महादेवा ॥
जय गणेश जय गणेश,जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,पिता महादेवा ॥
गणपतीची आरती
नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
जय अम्बे (देवीची आरती)
जय अम्बे गौरी,मैया जय श्यामा गौरी,
तुमको निशदिन ध्यावत,हरि ब्रह्मा शिवरी।
मांग सिंदूर विराजत,टीको मृगमद को,
उज्ज्वल से दोउ नैना,चंद्रवदन नीको॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
कनक समान कलेवर,रक्ताम्बर राजै,
रक्तपुष्प गल माला,कंठन पर साजै॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
केहरि वाहन राजत,खड्ग खप्पर धारी,
सुर-नर-मुनिजन सेवत,तिनके दुखहारी॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
कानन कुण्डल शोभित,नासाग्रे मोती,
कोटिक चंद्र दिवाकर,सम राजत ज्योती॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
शुंभ-निशुंभ बिदारे,महिषासुर घाती,
धूम्र विलोचन नैना,निशदिन मदमाती॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
चण्ड-मुण्ड संहारे,शोणित बीज हरे,
मधु-कैटभ दोउ मारे,सुर भयहीन करे॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
ब्रह्माणी, रूद्राणी,तुम कमला रानी,
आगम निगम बखानी,तुम शिव पटरानी॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
चौंसठ योगिनी मंगल गावत,नृत्य करत भैरों,
बाजत ताल मृदंगा,अरू बाजत डमरू॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
तुम ही जग की माता,तुम ही हो भरता,
भक्तन की दुख हरता,सुख संपति करता॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
भुजा चार अति शोभित,खडग खप्पर धारी,
मनवांछित फल पावत,सेवत नर नारी॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
कंचन थाल विराजत,अगर कपूर बाती,
श्रीमालकेतु में राजत,कोटि रतन ज्योती॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
श्री अंबेजी की आरति,जो कोइ नर गावे,
कहत शिवानंद स्वामी,सुख-संपति पावे॥
॥ॐ जय अम्बे गौरी...॥
जय अम्बे गौरी,मैया जय श्यामा गौरी,
तुमको निशदिन ध्यावत,हरि ब्रह्मा शिवरी।
विठ्ठल आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । हरी पांडूरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
तुळसी माळा गळां कर ठेवुनी कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढें उभे राहती ।।
जय देव ।। 2।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां ।
राही रखुमाबाई राणीया सकळा ।
ओंवळिती राजा विठोबा सांवळा।।
जय देव ।।3।।
ओंवाळूं आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।।4।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नानें जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
जय देव जय देव ।।5।।
विठ्ठल आरती
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥
आरती तुकारामा
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।
सच्चिदानंद मूर्ती । पायी दाखवीं आम्हां ।।धृ ।।
राघवें सागरांत । जैसे पाषाण तारिले ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले । आरती ।।१ ।।
तुकितां तुलनेसी । ब्रम्ह तुकासी आलें ।
म्हणोनी रामेश्वरें । चरणी मस्तक ठेविलें ।।आरती तुकारामा ।।२ ।।
आरती एकनाथा
आरती एकनाथा । महाराजा समर्था ।
त्रिभुवनी तूंचि थोर । जगदगुरू जगन्नाथा ।।ध्रु. ।।
एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचे गूज ।
संसारदु:ख नाम । महामंत्राचे बीज । आरती ।।१ ।।
एकनाथ नाम घेतां ।सुख वाटले चित्ता ।
अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां । आरती ।।२ ।।
आरती दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा।
आरती हे तव चरणी राहो।।
आरती हे तव चरणी राहो।।
नति तति गुरुवरा।। दिगंबरा.।।
दिग्भरवेष्टितमबभ्रमेव प्रत्यम्बृह्मेति। खं ब्रह्मोति श्रुतिरपि वदति। खं ब्रह्मोति श्रुतिरपि वदति दिगंबराचेति।।1।।
दिगवत् चाम्बरमेव व्यापक पूर्णब्रह्मोति। सच्चित्सुखघनमायातीत सच्चितसुखघनमायातींत दिगंबरा वदति।। 2।।
श्रीपादवल्लभ नाम प्राप हि नक्रगजेंद्रमिव। द्रौपघंबरीषचोर द्रौपघंबरीषचोर ग्रसितद्विजमेव।। 3।।
दिगंबरा गुरु वासुदेव दत्तस्त्वं ब्रह्म। कामक्रोधग्रसितं मां लभ। कामक्रोधग्रसितं मां लभ तथैव झटिति वह।। 4।।
दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनिया उभा ठाकला
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥
श्री दत्ताची आरती
दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ । जनार्दन स्वामी एकनाथ ॥
हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥
अनन्यभावें अखंड जे कां भजती निजभक्त । जे कां भजती निजभक्त ॥
भक्ति देउनि दत्त तयांसी करी सहज मुक्त ॥ दत्ता. ॥ १ ॥
ठाकुरदासा अनाथ जाणुनि करितो सनाथ । जाणुनि करितो सनाथ ॥
एकपणे विनटला दावी सद्गुरू एकनाथा ॥ दत्तात्रय अवधूत जनार्दन ॥ २ ॥
श्री ज्ञानदेवाची आरती
आरती ज्ञानराजा। महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत ।। मनु वेधला माझा ।। आरती ।।धृ ।।
लोपलें ज्ञान जगी । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविले ज्ञानी ।।१ ।।
आरकाचे ताट करी ।उभ्या गोपिका नारी।
नारद तुंबर हो । साम गायन करी ।।२ ।।
प्रकट गुह्य बोले । विश्र्व ब्रम्हाची केलें ।
रामजनार्दनी पायी मस्तक ठेवीलें ।।३ ।।
प्रार्थना
घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा,
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।
हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।।५।।
शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
श्री देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंवे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
हनुमान आरती
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।
दशावतारांची आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥
अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥
रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥
पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥
सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥
मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥
देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥
बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥
Comments
Post a Comment